दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत करा – भाजप विद्यार्थी आघाडीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

भाजप विद्यार्थी आघाडीचे तहसीलदार देवरी मार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन


देवरी 17 – सध्या सर्वत्र कोरोनाच्या उद्रेकाच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे बोर्डाला दिलेले परीक्षा शुल्क सदर विद्यार्थ्यांना परत करुन न्याय मिळवून देण्याचे मागणी निवेदन देवरी तालुका भाजप विद्यार्थी आघाडीच्या वतीने 17 मे सोमवारला येथील तहसीलदार मार्फत शिक्षणमंत्र्यांना पाठवले आहे.


सध्या महाराष्ट्रात मागील वर्षीपेक्षाही यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे अनेकांना नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यात विद्यार्थी सुद्धा सुटलेले नाहीत.
यासर्व बिंदूंचा विचार करुन महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा घेतली जाणार नाही म्हणून, नुकतीच घोषणा केली आहे. परंतू , परीक्षा बोर्डाच्या नियमानुसार परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपआपल्या शाळेमार्फत कोरोनाच्या काळात अनेक पालकांचे पोटापाण्याचे व्यवसाय तथा धंदे उद्ध्वस्त झाले असले तरीपण परीक्षा बोर्डाला प्रत्येकी 415 /- रुपये शुल्क दिले आहे.


असे 415 /- रुपये शुल्क भरणारे महाराष्ट्रात एकूण विद्यार्थी 17 लाखाहून अधिक असून 68 कोटीपेक्षा जास्त शुल्क सदर परीक्षा बोर्डाच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे, जमा झालेल्या शुल्कचे काय करणार ? आणि म्हणून, कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे व्वसायात झालेल्या अनेक पालकांचे आर्थिक नुकसान बघता सदर सर्वच दहावीच्या विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क परत मिळून न्याय मिळवून देण्यासाठी 17 मे सोमवारला देवरी तालुका भाजप विद्यार्थी आघाडी तर्फे यात तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, देवेंद्र गायधने, तुषार बहेकार, राकेश डोंबळे, राहुल मडावी, आदी कार्यकर्त्यांनी स्थानिक तहसीलदार मार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवले आहे.
दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरीपण पुढील शिक्षणासाठी तथा इयत्ता 11 वीच्या प्रवेशाबाबत उपाय योजना काय ? कोणत्या आधारावर किंवा कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार आहे ? याची घोषणा आपण शिक्षणमंत्री या नात्याने ताबडतोब करावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील तयारी करायला वाव मिळेल; अशी टीप सुद्धा सदर निवेदनात उल्लेख केले आहे; हे विशेष.

Print Friendly, PDF & Email
Share