५ हजार मंथलीच्या नादात पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नागपूर : तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांचे लॉन असून लेटनाईट ची कारवाई न करण्याकरिता आलोसे महेश किसन निकम, पद पोलीस उपनिरीक्षक, नेमणुक पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर, नागपूर शहर यांनी तक्रारदार यांना मासिक ५ हजार रू. लाचेची मागणी करून ५ हजार रु. लाच रक्कम स्वतः स्विकारली.

आलोसे यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रकमेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन राणाप्रतापनगर, नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आलोसे यांना अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने आलोसे, महेश किसन निकम यांचा ३ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे.

सदरची कारवाई राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस निरीक्षक प्रिती शेन्डे, नापोशि भागवत वानखेडे, नापोशि उपेन्द्र अकोटकर, पोशि हेमराज गांजरे, मपोशि दिपाली भगत, चामपोशि प्रिया नेवारे यांनी केलेली आहे.

Share