कविता – जगण्यात दुःख नाही

जगण्यात दुःख नाही
मरण्यात दुःख नाही
जगलो भरपूर मस्त जीवन
आता मारण्याच दुःख नाही //धृ //

संधिही मज आल्या
संकटेही मज आली
लढलो असा मी आता
चारो चित दिशाही झाल्या //१//

पडले जे प्रश्न मला
सोडविले असे मी त्याला
मला उमजले आता
या परिक्षेत दम नाही //२//

रेंगाळलो जमिनीवरती
चढलो शिखरावरती
वरुण बघितले आता
या शर्यतीत तथ्य नाही //३//

होतो शून्य मी तेव्हा
पुढे अंकेही आली
बेरीज करता करता
आता गणितात रस नाही //४//

जीवन हे विशाल
का कुढत जगावे
असे जगावे मस्त जीवन की
आता मारण्याच दुःख नाही //५ //

श्री. विशाल चंदनखेडे
पद. प्राथ. शिक्षक
शास. मा. आश्रम शाळा पानबारा
ता- नवापुर जि – नंदुरबार

Share