रूग्णालयातील कैची व सर्जिकल ब्लेडने आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

स. अर्जुनी 08: ०६ मे रोजी १६ : ३० वा. दरम्यान फिर्यादी पोउपनि. मधुकर चंद्रया सामलवार पोलीस स्टेशन डुग्गीपार हे आरोपी यास के.टी.एस. रूग्णालय गोंदिया येथुन भंडारा कारागृह येथे दाखल करण्यास जात असतांना सडक अर्जुनी गावाजवळ आरोपींची अचानक तबीयत बिघडल्याने आरोपीस ग्रामिण रूग्णालय सडक अर्जुनी येथे नेले.

मात्र उपचारा दरम्यान आरोपीने रूग्णालयातील कैची व सर्जिकल ब्लेड ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. डुग्गीपार येथे अप क. १०५/२०२१ कलम ३०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. शेन्डे/ ५२९ पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.

Share