पोलिसांना राखी बांधून भाजप महिला आघाडीने जपले बंधुभाव

◾️देवरी तालुक्यात सविता पुराम यांच्या पुढाकाराने रंगला रक्षाबंधन सोहळा

देवरी: समाजाच्या सुरक्षिततेसाठी सण-उत्सव विसरून रात्रंदिवस अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या आणि घरापासून दूर असणाऱ्या शेकडो पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी देवरी तालुक्याच्या वतीने आज, २८ ऑगस्ट रोजी भव्य रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा परिषद सदस्य सविता संजय पुराम यांच्या प्रमुख पुढाकारातून आणि भाजप महिला आघाडी देवरी तालुकाध्यक्ष सौ. शामकला ताई गावड यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सफाई कामगार व पोलीस दलाला बांधली राखी
आज सकाळी कार्यक्रमाची सुरुवात देवरी नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना राखी बांधून करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील विविध पोलीस ठाणे व पोलीस कॅम्पमध्ये जाऊन महिला पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यावर तैनात असलेल्या शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना राखी बांधली. याप्रसंगी महिलांनी पोलीस बांधवांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली, तर पोलीस कर्मचाऱ्यांनीही समाजाच्या व महिलांच्या रक्षणाचे वचन दिले.
आज भाजपच्या महिला पदाधिकारी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सविता पुराम,नगरपंचायत उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, जि. प. सदस्य कल्पनाताई वालोदे,पं.स.सदस्य, श्यामकला गावड,वैशाली पंधरे,अंबिका बंजार,ममता अंबादे,नगरपंचायत सदस्य,पिंकी कटकवार, नूतन कोवे,कमल मेश्राम, अंजुताई बिसेन,रचना उजवणे,प्रभाताई सलामे, डीलेश्वरी बिंझाडे ,रोहिणी कावळे,यांनी देवरी,चिचगड,मगरडोह,बोंडे, पिपरखारी, कडीकसा येथे जाऊन शेकडो पोलिस बांधवांना राखी बांधली.
या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस दल आणि समाजामधील बंधुभावाचे नाते अधिक दृढ करण्याचा आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. आपल्या कुटुंबापासून लांब राहून सीमेवर व नक्षलग्रस्त भागात संवेदनशील कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर राखी बांधताना एक वेगळाच आनंद आणि आपुलकी दिसून आली. आयोजक सविता संजय पुराम व भाजप महिला आघाडीच्या या उपक्रमाचे संपूर्ण तालुकाभरातून कौतुक केले जात आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें