चिचगड येथे ईदनिमित्त सर्वधर्मीय सलोखा; मुस्लिम बांधवांकडून सामाजिक बंधुत्वाचा आदर्श संदेश

देवरी / चिचगड : ईदच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून चिचगड येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक बंधुता आणि सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन घडवणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सणाचा आनंद केवळ एका समाजापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील सर्व समाजांतील नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा जपण्याचा एक नवा आदर्श येथे निर्माण करण्यात आला.

या सामाजिक सलोखा कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून चिचगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन वासुदेव, जयश्री गव्हाणे, चिचगडच्या सरपंच भाग्यश्री भोयर आणि जिल्हा परिषद सदस्या राधिका धरमगुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

आयोजकांचा पुढाकार सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला शेख, उपाध्यक्ष इरशाद शफी शेख, सचिव इब्राहिम खाजा शेख, यासीन शफी शेख यांच्यासह सदस्य शेख हारून तुरक, मकसूद मकबूल शेख, सोयल काशिम शेख आणि अस्पाक बब्बू शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. चिचगडमध्ये आयोजित या सर्वधर्मीय उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें