देवरी – श्रीमती के एस जैन महाविद्यालय देवरी येथे प्राचार्या रजिया बेग यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेनुसार शिक्षक पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जकी उल्ला खान, अनिल कुर्वे, तिलक कोरांडे. येवले मॅडम. शिल्पाताई गोंडाने यांच्या उपस्थितीत हा शिक्षक पालक मेळावा पार पडला. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती, प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. श्री सोनवणे यांनी प्रास्तावित भाषणाद्वारे शाळेचा इतिहास व उल्लेखनीय कामगिरी व्यक्त केली. सदर कार्यक्रमात उच्च माध्यमिक व माध्यमिक वर्ग इयत्ता बारावी व इयत्ता दहावी च्या परीक्षेत गुणवंत, प्राविण्य प्राप्त कु धनश्री योगराज बीसेन कु महेविश खान कु साक्षी नेताम. कु.विद्या मळावी. दिव्या पटले कु. खुशी पंधरे. विद्यार्थिनींचा मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शील्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी,गोळा फेक स्पर्धेत विभागीय व राज्यस्तरावर नावलौकिक करणाऱ्या डिंपल काळे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. पालक वर्ग व शिक्षक यांच्यात संवाद साधण्यात आले .विद्यार्थ्यांच्या समस्या संस्कार , उज्वल भविष्य अभ्यास यासंबंधी प्रश्नोत्तराचे माध्यमातून साधक वादक चर्चा करण्यात आली. पालकांच्या संमतीने शिक्षक पालक समिती व माता पालक समिती गठित करण्यात आली.श्री मसराम, श्री लांजेवार. श्री बिसेन. श्रीमती परिहार, श्रीमती मुनीश्वर, श्रीमती काळे, श्रीमती जांभुळकर, श्रीमती वैकुंठी यांनी परिचय देऊन पालकांसोबत संवाद साधला. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक व पालक मेळावा हा विद्यार्थी घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रजिया बेग यांनी पालकांच्या समस्या ऐकून मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पटले यांनी केले आभार परिहार यांनी मानले.









