देवरी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

देवरी | २४ ऑगस्ट २०२६ : देवरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची महत्त्वपूर्ण सभा सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय, देवरी येथे गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष धनराज हुकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष सुभाष दुबे यांच्या उपस्थितीत पार पडली.

सभेत श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने मानव विकास अंतर्गत धावणाऱ्या बसेसच्या वेळेचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दि. २४ ऑगस्ट व दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी मानव विकासच्या बसेस दुपारी २.३० वाजता सोडण्यात याव्यात, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव आगार प्रमुखांना देण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्ट्यांचे नियोजन, FDA शालेय पोषण आहार नोंदणी तसेच तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीची निवड

सभेत देवरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी एम. जी. भुरे (छत्रपती शिवाजी विद्यालय, देवरी), कार्यवाहपदी डॉ. सुजित एच. टेटे (मुख्याध्यापक, ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी) यांची निवड करण्यात आली.

तसेच सहकार्याध्यक्षपदी जी. एस. राऊत, कोषाध्यक्षपदी डब्ल्यू. जी. देशमुख (श्रीराम विद्यालय चिचगड) आणि शैक्षणिक उपक्रम प्रमुखपदी डी. आर. नरेटी यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीचे उपस्थित मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अभिनंदन केले. तालुक्यातील शैक्षणिक प्रश्न, मुख्याध्यापकांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध बाबींवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे वरिष्ठ मान्यवर प्राचार्य विनोद गिर्हेपूंजे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, प्राचार्या रजिया बेग , प्राचार्य जी एम मेश्राम , प्रामुख्याने उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थित सर्व मुख्याध्यापक तथा प्राचार्यांचे आभार मानण्यात आले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें