मारुती सुझुकी व NRB Bearings मध्ये करिअरची संधी
देवरी | २३ ऑगस्ट २०२६ :
आयटीआय उत्तीर्ण युवक-युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), देवरी यांच्या वतीने सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, गुजरात प्लांट तसेच NRB Bearings, छत्रपती संभाजीनगर या नामांकित औद्योगिक कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवरी, जि. गोंदिया येथे करण्यात आले असून उमेदवारांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
पात्रता व आवश्यक अर्हता
या रोजगार मेळाव्यासाठी १८ ते २४ वर्षे वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. शैक्षणिक पात्रतेमध्ये १०वी उत्तीर्ण किमान ४० टक्के गुण तसेच ITI मध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे अपेक्षित असून संबंधित जाहिरातीनुसार कोणतेही गंभीर शारीरिक व्यंग किंवा उच्च BMI नसावा.
विविध ट्रेडमध्ये रोजगाराची संधी
मेळाव्यात मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, पेंटर, वायरमन, शीटमेटल, सीबीओ (ऑटोमोबाईल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टूल अँड डाय तसेच PPO आदी ट्रेडमधील उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.
कंपनीच्या प्रतिनिधींकडून उमेदवारांची मुलाखत व निवड प्रक्रिया घेण्यात येणार असून पात्र व मेहनती उमेदवारांना नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळणार आहे.
उमेदवारांसाठी आवाहन
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती घेऊन वेळेत उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी योग्य पोशाखात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कॅम्पस कोऑर्डिनेटर V. K. Kawale – 9922881337 यांच्याशी संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त उमेदवारांना भरती मेळाव्याचा लाभ घेण्याकरिता प्राचार्य प्रणाली दहाटे यांनी आवाहन केलेले आहे.
आयोजक : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवरी, जि. गोंदिया.








