३ री राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता जिल्हा संघ निवड चाचणीचे येत्या बुधवारी आयोजन

◆ निवड चाचणीचे बोदलकसा धरण येथे आयोजन

प्रहार टाईम्स :महाराष्ट्रीय ड्रॅगन बोट आणि ट्रेडीशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या ३ री राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा २०२६- २७ करिता गोंदिया जिल्हा ड्रॅगन बोट आणि ट्रेडीशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन गोंदिया यांच्या वतीने ड्रॅगन बोट खेळाच्या जिल्हा स्तरीय संघ निवडण्याकरिता निवड चाचणीचे आयोजन येत्या बुधवारी(ता.१९ आगस्ट) रोजी बोदलकसा धरण ता. तिरोडा जि. गोंदिया येथे करण्यात आले आहे,
गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे जाहीर आव्हान जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी या मो.नं ९८५२३८५५५५ वर संपर्क करावे असे कळविण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें