देवरी: स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे आपली परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वतंत्रदिनानिमित्त ध्वजारोहन करण्यात आला. विद्यार्थ्यांना खऱ्या लोकशाहीचे धडे शाळेतच शिकायला मिळायला पाहिजे आणि देशाविषयीचा अभिमान शालेय पातळीवरचं जागृत झाला पाहिजे या उद्देशाने प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी शालेय निवडणूक अगदी राजकीय पद्धतीनुसार लढविली होती. निवडणुकीत विजयी झालेले विध्यार्थी प्रतिनिधी स्नेहा दिलीप डुंभरे आणि सार्थक चरणदास उंदिरवाडे या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून प्रमोद रोकडे , डॉ.संगीता चांदेवार, हिमाली रहांगडाले, निदा मिर्झा, जयश्री डुंबरे, शालिनी उंदिरवाडे, प्राचार्य डॉ. सुजित टेटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सार्थक उंदिरवाडे आणि स्नेहा डुंबरे उपस्थित होते. नियोजित वेळेवर शालेय पटांगणावर विध्यार्थ्यांनी ध्वजारोहण केला. स्वागतगीत, देशभक्ती गीत गायन करून विध्यार्थ्यांनी देशाविषयची भावना व्यक्त केली.
विध्यार्थी जीवनात खरी लोकशाहीची बीजे रोवली जावी , एखाद्या आमदार खासदार प्रमाणे विध्यार्थ्यांना सुद्धा ध्वजारोहण करता यावी, देशाविषयीचा आदर आणि अभिमान शालेय जीवनापासून चिरकाल टिकून राहावे या संकल्पनेतून सदर ध्वजारोहण सोहळा पार पडला. सूत्रसंचालन राहत सय्यद यांनी केला आभार प्रदर्शन नलू टेंभरे यांनी मानला. कार्यक्रमाच्या यशासाठी निलेश लाडे, राहुल मोहुर्ले, भोजराज तुरकर, विश्वप्रीत निकोडे, चेतन सोनसर्वे, आकांक्षा डिब्बे, सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी आणि पालकांनी सहकार्य केला.








