नवपताच्या पहिल्याच दिवशी पारा ४६ पार

उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण

गोंदिया : मागील काही दिवसांपासून विदर्भ उष्णतेच्या लाटे होरपळून निघत आहेत. दिवेसंदिवस वाढत्या तापमानाच्या पाऱ्याने नागरिक चांगले हैराण झाले आहे. त्यातच आजपासून नवपताला सुरुवात झाली आहे. नवपताच्या पहिल्या दिवशी गोंदिया जिल्ह्याचा पारा ४६. १ अंश नोंदविण्यात आले. त्यामुळे आगामी ९ दिवस पारा आणखी किती उंचावणार, याचे अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यावर सुर्याचे आग ओकणे सुरू असल्याने भीषण उष्णता निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहेत. त्यामुळे सकाळी ९ वाजतापासूनच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. परिणामी रस्त्यासह गल्लीबोळात सुकसुकाट दिसून येत असून तर उष्णतेपुढे घरातील पंखे, कुलर आदी उपकरणांनीही नांगी टाकल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. २५ मेपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. सुर्याचे आग ओकणे आणखी तिव्र झाले आहे. जिल्ह्याचा पारा ४६.१ नोंद करण्यात आली. त्यामुळे नवतपामध्ये जिल्ह्यातील नागरिकांची चांगलेच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे.

27 में पर्यंत येलो अर्लट: हवामान खात्याकडून जिल्ह्यात २७ में पर्यंत येलो अर्लट जाहीर करण्यात आला होता. त्यात आजच्या, नवीन अहवालानुसार सोमवार २५ मेपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. यात उद्या पुन्हा बदल होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें