५० हजार रोपटे झाले जमिनदोस्त, वृक्षारोपण केवळ कागदावरच

यंदा १७ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे टारगेट

गोंदिया : पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र ज्या विभागावर ही जबाबदारी सोपवली आहे तो विभागच जबाबदारी पासून हात झटकेल तर पर्यावरण संरक्षणाचा उद्देश कसा पूर्ण होणार? गत वर्षी ‘माझी माती, माझा देश’ अभियानातंर्गत गोंदिया जिल्ह्यात जवळपास ५० हजार पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले होते. व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित विभागावर सोपविण्यात आली होती. मात्र देखरेखी अभावी बहुतांश वृक्ष नष्ट झाले व हिरवळ केवळ कागदावरच राहीली.

आता पुन्हा एकदा जिल्ह्या हिरवा बनविण्यासाठी १७ लाख वृक्ष लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा स्थितीला पाहून नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केला आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य नुसार राज्यातील व्यापक विकासातंर्गत हरित महाराष्ट्र अभियानात ३०० कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जर हे लक्ष्य पूर्ण झाले तर राज्यात हिरवळीचे क्षेत्रफळ ३३ टक्क्यापर्यंत पोहोचेल. या अभियानाला घेवून जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सभा घेवून जिल्ह्यात यंदा १७ लाख वृक्ष लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी आझादीचा अमृत महोत्सवातंर्गत ‘माझी माती, माझा देश’ अभियान सुरु करण्यात आले. यातंर्गत जिल्ह्यातील ५४७ गावातील माती दिल्लीला पाठविण्यात आली होती. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४ हजार २५ वृक्ष लावण्याचे दगडाचे फलक देखील स्थापन करण्यात आले होते. वृक्षांचे संवर्धन व संरक्षणाची जबाबदारी मनरेगावर सोपविण्यात आली होती. मात्र, देखरेखी अभावी बहुतांश वृक्ष जमिनदोस्त झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे संबंधित विभागाद्वारे वृक्षरोपण तर झाले मात्र, त्याची योग्य देखरेख करण्यात आली नाही. अशातच शासन-प्रशासनाद्वारे यावर्षी १७ लाख वृक्षारोपण करण्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

सिमेंट – काँक्रीटचे जाळे बनले अडथळा : शहरात आता खुली जमिन जवळपास नसल्या सारखीच आहे. संपूर्ण शहरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याने वृक्षारोपणासाठी जागा शोधणे समस्या बनले आहे. रस्त्यांचे रुंदीकरण व निर्माण कामांमुळे पारंपारिक वृक्ष देखील समाप्त झाले आहे. यामुळेच आता प्रशासनावर प्रश्न निर्माण होत आहे. आता जमिनच नाही आहे तर वृक्षारोपण कुठे करावे? असा सवाल उभा ठाकला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें