■ गोंदिया येथे जिल्हा भा.ज.प.च्या सभेत नियुक्ती
देवरी: देवरी नगरपंचायतचे बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नू शेख यांची भा.ज.प.च्या अल्पसंख्यांक आघाडीच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली.
सदर कार्यक्रम गोंदिया येथे जिल्हा भा.ज.प.च्या वतीने सर मवार रोजी आयोजीत सभेत करण्यात आले. या सभेत आमदार परिणय फुके,आमदार संजय पुराम,आमदार विनोद अग्रवाल,आमदार विजय राहांगडाले व महिला जिल्हाध्यक्ष सिताताई राहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आफताब उर्फ अन्नू भाई शेख यांना जिल्हाध्यक्ष पदावर निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून यांचे अभिनंदन करून पुढील यशश्वी वाटचाली करीता शुभेच्छाही देण्यात आले.
यावेळी आफताब उर्फ अन्नू शेख यांनी पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ताला एवढ्या मोठ्या पदाची जवाबदारी सोपवीली आहे. हि जवाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडीन. पक्ष संगठन वाढविण्याकरीता मी वेळोवेळी समाजाचे व पक्षाचे मार्गदर्शन घेत राहीन. असे मनोगत व्यक्त केले.
आपल्या निवडीचे श्रेय आफताब शेख यांनी या क्षेत्राचे आमदार संजय पुराम,आमदार परिणय फुके आणि संगठनमंत्री विरेन्द्र अंजनकर यांना दिले आहे.
यांच्या निवडीबद्दल भा.ज.प. पक्षातील पदाधिकारी व सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.








