◼️ विद्यार्थी आणि पालक थिरकले गरबा नृत्यावर
देवरी : तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये नवरात्री व गरबा महोत्सव २०२५ थाटात संपन्न झाला असून सदर महोत्सवाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले होते . यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त आनंदोत्सव साजरा केला .सदर कार्यक्रमाच्या उदघाट्नाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उमेश काशीद प्रकल्प अधिकारी , पीएसआय गीता मुळे, डॉ. डिंपल तिराले, डॉ. निखिल चुटे , डॉ. शिवानी चूटे . गुंजन जैन आणि डॉ सुजित टेटे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माताराणी च्या प्रतिमेची पूजा अर्चना करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजित टेटे यांनी केले.
नर्सरी , केजी ते वर्ग दहावी पर्यंतचे विद्यार्थी गरबा नृत्य महोत्सवात सहभागी झाले असून विविध संस्कृतीचे आणि कलागुणांचे दर्शन यावेळी विद्यार्थ्यांनी दाखविले. खास करून पालकांनी या महोत्सवात आपली हजेरी लावून आनंदोत्सव साजरा केला. पालकांच्या गरबा नृत्य स्पर्धेत अनेक महिला सहभागी झालेल्या सदर गरबा स्पर्धेचे गुणदान व मूल्यमापन डॉ. डिंपल तिराले आणि गुंजन जैन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले यांनी केले असून आभारप्रदर्शन सरिता थोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








