बोरगाव येथे वृक्षारोपण तसेच गट्टू कामाचे भूमिपूजन
देवरी : संत, महापुरूषांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे! पक्षी ही सुस्वरे आळवती!! पावसाळा जवळ आलाय की, बर्याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. ही एक चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून प्रत्येक वर्षी तापमानात होणारी वाढ आणि त्याचे दुष्परिणाम कमी करता येते. तसेच चांगला विद्यार्थी घडावा, याकरिता शाळेतील शिक्षकांबरोबर आई-वडिलांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. तेव्हाच एक सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे काम आपल्या हातून होणार, असे प्रतिपादन पं.स.सभापती अनिल बिसेन यांनी केले.
देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत ग्राम बोरगाव येथील जि.प. प्राथ. शाळेत ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण तसेच शाळेत गट्टू कामाचे भूमिपूजन देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अनिल बिसेन होते. प्रमुख अतिथी म्हणून शिलापूरचे सरपंच गरीबा टेंभुरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदेश मेश्राम, शिक्षिका तारू, बमणावत, गायकवाड, मंगेश फुंडे, ग्रा.पं.सदस्य नरेश भोयर, ब्लॉसम पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.सुजित टेटे, सामाजिक कार्यकर्ता सचिन भांडारकर, सुजित अग्रवाल, चैतराम नंदेश्वर, पत्रकार विलास शिंदे, अमित तरजुले, कृषी सहाय्यक, वहिद कुरेशी, जगपाल वैद्य अभियंता, कल्पना काळसर्पे उपाध्यक्ष शा.व्य., चेतन ताराम, संगीता ताराम, चेतना साखरे, प्रमिलाबाई कोल्हारे, निरुपा काळसर्पे, अर्चना साखरे अंगणवाडी सेविका, रीना गावराने मदतनीस, गीता ठाकरे, शोभा राऊत तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.शाळेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सभापती अनिल बिसेन व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात पाम, जांभूळ, आंबा, सिताफळ, अशोक, बेल, चिंच, आवळा, अशा वेगवेगळ्या झाडांचे लागवड केली. त्याचप्रमाणे देवरी वन विभागाच्या अधिकार्यांनी झाडाची लागवड, झाडाचे संगोपन, झाडाची वाढ यावर भर देत वृक्षारोपणाचे सखोल महत्त्व उपस्थितांना सांगितले. शिलापूर ग्रामपंचायतचे सरपंच गरिबा टेंभुरकर यांनी शाळेतील समस्यांचा आढावा घेत शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक ललित थूलकर तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गणेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
…………..









