सोनारटोला येथील ३० वर्षीय इसम बेपत्ता

देवरी: सालेकसा पोलीस स्टेशन अंर्तगत येणा-या देवरी तालुक्यातील सोनारटोला येथील एक ३० वर्षीय संजय रविंद्र बारसे इसम हा मंगळवार (ता.१७ जून २०२५) रोजी घरी काही न सागंता घरून निघुन गेला. या बाबद ची तोंडी तक्रार फिर्यादी पत्नी भाग्यश्री हिने सालेकसा पोलीस स्टेशन ला गुरूवार (ता.१९ जून २०२५) रोजी रोजी दाखल केली आहे.
बेपत्ता इसमाचे वर्णन, रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, अंगात काळ्या रंगाची टिशर्ट,ग्रे रंगाचा पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, बांधा मध्यम, केस बारीक काळे तसेच मराठी व हिंदी भाषा बोलनारा संजय बारसे हा इसम सोनारटोला येथील राहत्या घरून घरच्या लोकांना काहीही न सांगता घरून निघुन गेला.नंतर पत्नीने पतिच्या मोबाईलवर फोन केला असता बंद दाखवत आहे. याची आजुबाजुच्या परिसरात,मित्रांनकडे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता याचा काही पत्ता लागला नाही. या बाबदची तोंडी तक्रार सालेकसा पोलीस स्टेशन दिली.
संजय बारसे या इसमाचा काही माहिती मिळाल्यास सालेकसा पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रमांक ०७१८०-२४४१००
किंवा सुमित मुनेश्वर मो.क्रं- ९६६५४८६८६४;९१४५५२८४९१; ९१४५५०८०७७, अनिल महारवाडे मो.क्रं- ९२८४३९७०१२, अनिल वानखेडे मो.क्रं- 9049808090
मनिष पाथोडे मो.क्रं -7666411258 यावर माहिती दयावी असे कळविण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें