गोंदिया जिल्हात १ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू
गोंदिया : पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयाचे १२ डिसेंबरचे पत्रानुसार जिल्ह्यात १८ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस दिन साजरा करण्यात येणारआहे. ३१ डिसेंबर रोजी मावळते वर्ष व नविन वर्ष आगमन साजरा करण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन १९५१ च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक २२ चे कलम ३७ (१) (३) अन्वये दिनांक १८ डिसेंबर २०२४ पासून ते १ जानेवारी २०२५ पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.