सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..!!..!!

सडक अर्जुनी : मा. उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी तसेच पक्षकारांनमधे सलोख्याचे संबध टिकविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये दिवाणी स्वरुपाचे दावे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक हिसाचारा पासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ मधील अर्ज, चेक बाउन्सची प्रकरणे, बँक कर्ज वसुली प्रकरणे, तसेच दाखलपूर्व प्रकरणात विज कर, पाणी कर, वीज बिल संबंधी देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादा संबंधी प्रकरणे, महसूल प्रकरणे इ. समावेश होतो तसेच संक्षिप्त गुन्ह्यात गुन्हा कबुली केल्यास कमीत कमी दंड आकारून प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येतो यासाठी सडक अर्जुनी न्यायालयात चौथ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकन्यायालयात मिटलेल्या प्रकरणांमध्ये अपील होत नाही तसेच न्यायालयीन फी देखील लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी येत्या १४ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित चौथ्या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आपला अमूल्य वेळ व पैसा वाचवावा, अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोदिया अथवा तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी येथे संपर्क साधावा असे आवाहन न्यायाधीश डॉ. विक्रम अं. आव्हाड यांनी केले आहे.

Share