देवरी : दुचाकींची आमोरासमोर धडक, ३ गंभीर

देवरी ( प्रहार टाईम्स) : तालुक्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून देवरी आमगाव रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळील मोडीवर दुचाकीचे आमोरासमोर धडक दिल्याने अपघात घडले असून यामधे ३ इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना गोंदिया रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. यामधे श्याम आनंद फुरसूंगे 26 वर्ष, सलमान एजाज खान 27 वर्ष अमरावती, सौरभ राजेंद्र येलके 25 जांभोरा गोंदिया असे जखमिंचे नाव आहेत.

Share