निवडणुकीचा हिशोब द्या , नाही तर होणार कारवाई

गोंदिया: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २५ दिवसांत प्रत्येक उमेदवाराला पावतीसह हिशेब द्यावा लागणार आहे. यापूर्वी, निरीक्षकांच्या उपस्थितीत दोन वेळा तपासणी करण्यात आली. आता शेवटची तपासणी निकाल लागल्याच्या ३० दिवसांत होणार आहे. त्यापूर्वी म्हणजे, १८ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांचा निवडणूक खर्च कक्षात द्यावा लागेल. अन्यथ उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील चारही  विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी शुक्रवार व शनिवार नोव्हेंबरला खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. प्रत्येक मतदारसंघांसाठी एक निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती यापूर्वीच निवडणूक आयोगाद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे खर्चाची तपासणी होत आहे. उमेदवारांनी नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च संनियंत्रण पथकाद्वारे नोंदविलेल्या खर्चात तफावत आढळल्यास निवडणूक निर्णय अधिकार्‍यांद्वारे संबंधित उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांना त्यांचा निवडणूक खर्च १८ डिसेंबरच्या सायंकाळी ५ वाजतापर्यंत संबंधित निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात सादर करावा लागणार आहे. संबंधित मतदारसंघात उमेदवांच्या खर्च लेख्यांची अंतिम तपासणी २३ डिसेेंबरच्या आत होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अन्यथा कारवाई…

प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्च मुदतीत सादर करणे अनिवार्य आहे. तो खर्च न दिल्यास नोटीस बजावली जाते. यानंतरही खर्च न दिल्यास उमेदवारावर कारवाई केली जाते. तसेच निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षासाठी अपात्र ठरविले जाते.

Share