जिल्ह्यात 64 उमेदवार निवडणूक रिंगणात, 39 उमेदवारांची माघार

गोंदिया, दि.4 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. आज 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 39 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात 64 उमेदवार आहेत. यामध्ये 63-अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून 19 उमेदवार, 64- तिरोडा मतदारसंघातून 21 उमेदवार, 65-गोंदिया मतदारसंघातून 15 उमेदवार व 66-आमगाव मतदारसंघातून 09 उमेदवार, असे एकूण 64 उमेदवारांचा समावेश आहे.

    जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे आणि निवडणूक लढवित आहे असे उमेदवार पुढीलप्रमाणे. 63-अर्जुनी मोरगाव – माघार घेतलेले उमेदवार- मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे, नंदागवळी राजेश मुलचंद, किरण यशवंत कांबळे, जगन उर्फ जयेश बारसुजी गडपाल, विश्वनाथ नत्थु खोब्रागडे, निशांत हिरालाल राऊत, किरण महादेव कटारे, प्रदिपकुमार शिवराम गणवीर, हरिशकुमार देवराव बन्सोड, महेश उर्फ मिथुन मनोजकुमार मेश्राम, यशवंतराव धनुजी उके, अशोककुमार मोतीराम लांजेवार, ॲड.पोमेश सुखदेव रामटेके, डॉ.भारत बाजीराव लाडे, दानेश मदन साखरे, डॉ.रिता अजय लांजेवार. रिंगणात असलेले उमेदवार- बडोले राजकुमार सुदाम (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), बन्सोड दिलीप वामन (इंडियन नॅशनल काँग्रेस), भावेश उत्तम कुंभारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सचिनकुमार नांदगाये (बहुजन समाज पार्टी), अनिल रविशंकर राऊत (हमर राज पार्टी), कश्यप भिमराव मेश्राम (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक), चंद्रिकापुरे सुगत मनोहर (प्रहार जनशक्ती पार्टी), दिनेश रामरतन पंचभाई (वंचित बहुजन आघाडी), अजय सुरेश बडोले (अपक्ष), अजय संभाजी लांजेवार (अपक्ष), अनिलकुमार प्रेमलाल मेश्राम (अपक्ष), केतन आसाराम मेश्राम (अपक्ष), खरोले सुजित विक्रम (अपक्ष), निता निलकंठ साखरे (अपक्ष), नितेश अनिल बोरकर (अपक्ष), प्रफुल ठमके (अपक्ष), डॉ.बबन रामदास कांबळे (अपक्ष), रत्नदिप सुखदेव दहिवले (अपक्ष), राजेंद्र काशिनाथ टेंभुर्णे (अपक्ष) 64-तिरोडा – माघार घेतलेले उमेदवार- आग्रे रविंद्र हेमराज, ओमप्रकाश राधेलाल पटले, रमेशकुमार ताराचंद ठाकुर, राजकुमार धरमदास भेलावे, संजय भुवनलाल अटरे, कटरे जितेन्द्र बाबुलाल. रिंगणात असलेले उमेदवार- चंपालाल दशरथ साठवणे (बहुजन समाज पार्टी), रविकांत खुशाल बोपचे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गट), विजय भरतलाल रहांगडाले (भारतीय जनता पार्टी), अतुल मुरलीधर गजभिये (वंचित बहुजन आघाडी), दिनेश दुधराम टेकाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), प्रताप तिलकचंद पटले (संभाजी ब्रिगेड पार्टी), रविंद्र दिलीप सोयाम (पीपल्स युनियन पार्टी), राजेश माधोराव आंबेडारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अजय विश्वनाथ अंजनकर (अपक्ष), कोसरकर खुशाल देवाजी (अपक्ष), गजभिये कैलाश बुधराम (अपक्ष), डोंगरे मनोज युवराज (अपक्ष), तायवाडे राजेशकुमार मयाराम (अपक्ष), नरेंद्रकुमार गणपतराव रहांगडाले (अपक्ष), नितेश शालिकराम खोब्रागडे (अपक्ष), निरजकुमार भुमेश्वर मिश्रा (अपक्ष), निलेश प्रदिप रोडगे (अपक्ष), राजेंद्र दामोदर बोंदरे (अपक्ष), वनिता बेनीलाल ठाकरे (अपक्ष), सुरेश दादुजी टेंभरे (अपक्ष), सोनु आर. टेंभेकर (अपक्ष). 65-गोंदिया – माघार घेतलेले उमेदवार- जनार्दन महादेव बान्ते, प्रदीप सोमाजी वासनिक, अग्रवाल सविता, प्रेमलाल महेपाल लिल्हारे, राजीव रुपचंद ठकरेले, पंकज सुंदरलाल यादव, लक्ष्मण किसनलाल नागपुरे, फिरोज कासम खान, अविनाश रामदास नेवारे, सुरेन्द्र बारकु उके, हरिशकुमार धरमलाल नागपुरे, प्रमोद गजभिये, भुमेश्वर कोदुराम हरिणखेडे. रिंगणात असलेले उमेदवार- अग्रवाल गोपालदास शंकरलाल (इंडियन नेशनल काँग्रेस), अग्रवाल विनोद (भारतीय जनता पार्टी), नरेंद्र सुहागन मेश्राम (बहुजन समाज पार्टी), सुरेश रमनकुमार चौधरी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), राजेशकुमार हनवतलाल डोये (राईट टू रिकॉल पार्टी), सतीश सदाराम बन्सोड (वंचित बहुजन आघाडी), अरुण नागोराव गजभिये (अपक्ष), ओमप्रकाश सोमाजी रहांगडाले (अपक्ष), गोविंद रामदास तिडके (अपक्ष), चंद्रशेखर उर्फ बालु लिचडे (अपक्ष), दुर्गेश बिसेन (अपक्ष), नागेश्वर राजेश दुबे (अपक्ष), डॉ.बडोले विनोद काशिरामजी (अपक्ष), सुरेश दादुजी टेंभरे (अपक्ष), संतोष बलीराम लक्षणे (अपक्ष). 66-आमगाव – माघार घेतलेले उमेदवार- दुर्गाप्रसाद लक्ष्मण कोकोडे, अनिल समारु कुंभरे, वासुदेव भिकु घरत, यशवंतराव ओकटु ताराम. रिंगणात असलेले उमेदवार- दिलीप रामाधीन जुळा (बहुजन समाज पार्टी), राजकुमार लोटुजी पुराम (इंडियन नेशनल काँग्रेस), संजय पुराम (भारतीय जनता पार्टी), देवविलास तुलाराम भोगारे (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी), निकेश झाडु गावड (वंचित बहुजन आघाडी), वामन पुनेश्वर शेळमाके (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), चाकाटे विलास पंढरी (अपक्ष), यशवंत अंताराम मलये (अपक्ष), शंकरलाल गुणेजी मडावी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

    0000000

    Share