सोशल मीडियावर उमेदवारांची यादी वायरल, Fake की Real ?

देवरी: नुकतेच निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या आमगाव देवरी विधानसभेत एका पक्षाच्या कार्यकर्तांनी भांडण धक्काबुक्की केल्याचे वीडियो आणि बातमी ताज्या असतांना आज सकाळी सोशल मीडियावर एक यादी प्रकाशित झाली. यामधे १८ उमेदवारांचे नाव अधोरेखित केले असून यामुळे विभानसभेत चर्चेला उधाण आले आहे.

आज काही पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे चित्र असून सदर यादी खरी की खोटी सिद्ध होणार आहे. सबंधित वायरल यादी बद्दल माहिती मिळविली असता ही यादी फेक ( खोटी )असल्याची माहिती समोर आली आहे.

असे असले तरी आमगाव देवरी विधानसभेचे उमेदवार कोण ठरणार याची चर्चा तीव्र होत चालली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें