मॉ धुकेश्वरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ३ ऑक्टोबर गुरुवारला सायंकाळी ६ वाजता घटस्थापना, ४ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता १३ वर्षांखालील मुलांमुलींसाठी एकल नृत्य व सामुहिक नृत्य स्पर्धा, ५ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता भव्य संगीत भजन स्पर्धा, ६ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता १३ वर्षांवरील मुलांमुलींसाठी एकल नृत्य व सामुहिक नृत्य स्पर्धा, ७ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता शिवभक्त मानस परिवार संध्या भजन, ८ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता जस झाकी, ९ ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता गर्भा शो, १० ऑक्टोबरला रात्री ७ : ३० वाजता ओपन दांडिया स्पर्धा, ११ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपासून अष्टमी हवन, सायंकाळी हार, थाली सजावट व रांगोळी स्पर्धा आणि १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ : ३० वाजता साडी वितरण तथा रात्री ८ वाजता ज्योत विसर्जन व महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
इच्छुक भक्तांच्या मनोकामनासाठी ज्योत स्थापना बुकिंग सुरु असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसोबतच भव्य झाकी चलित चित्रण, इलेक्ट्रीक झुले आणि मिना बाजाराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तरी भक्तांनी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share