देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात अवैद्य धंद्यांना उत, तरुणाई व्यसनाच्या आहारी,गुन्हेगारीत वाढ!

◼️अवैद्य दारू ,गांजा , सुगंधित तंबाखू ची खुलेआम विक्री

◼️व्यसनाधीन तरुणाईमुळे पालकांचे टेन्शन वाढले

◼️अवैद्य धंदे करणाऱ्यांचा ग्रामीण भागात हब

देवरी ◼️ तालुक्यातील ग्रामीण भागात अवैद्य दारू, गांजा , सुगंधित तंबाखू विक्रीचे बे-लगाम व्यवसाय सुरू असल्यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्याचे स्पष्ट चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे पालकांचे टेन्शन वाढलेले असून मुलांच्या भविष्याची चिंता वाढलेली आहे.

ग्रामीण भागात मुख्य चौकाचौकात दारू विक्री होत असतांना सुद्धा सबंधित विभाग बघ्याची भूमिका बजावत असल्यामुळे सामान्य जनतेला सबंधित प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलेले आहे.

ग्रामीण भागातील लग्न समारंभात येणाऱ्या वऱ्हाडी लोक काही क्षणात अवैद्य दारू गांजा विकणारे दुकानाचा शोध घेतात. मग सबंधित विभागात गप्प का ? असा देखील प्रश्न उपस्थित होतो. या प्रकारामुळे सामाजिक कार्यक्रमात भांडण, गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे महिला आणि मुलीं असुरक्षित असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे अवैद्य धंदे करणाऱ्यांनी ग्रामीण भागात आपले हब तयार केले असून सामाजिक वातावरण दूषित करीत असल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि तरुणाई व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे गुन्हे प्रवृत्तीत वाढ झालेले दिसून येते.

सबंधित विभाग या अवैद्य धंदे करणाऱ्यांवर लगाम लावणार का? सबंधित विभागाचे आणि अवैद्य धंदे करणाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना? जनसामान्य आणि महिला वर्गाला सुरक्षित वातावरण मिळणार का ? अशा सवाल उपस्थित झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share