मधमाश्यांच्या हल्यात मृत झालेल्या पोलीस कर्मचा-याचा शासकीय इतमामात अंतिमसंस्कार

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावधांब पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या धाबेपवनी AOP ला कार्यरत पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम (वय 57)यांच्यावर मधमाश्यानीं केलेल्या हल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 1 मे रोजी घडली.
पोलिस अधिक्षक कार्यालयात 1 मे दिनानिमीत्त आयोजित परेड करुन धाबेपवनीला परत येत असतांना पोलीस कर्मचारी आनंदराव मेश्राम यांच्यावर मधमाश्यानी हल्ला केला.यात ते गंभीर जखमी झाल्याने प्राथमीक उपचारानंतर देवरी येथील ग्रामीण रुग्नालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले.परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले.

Share