16 वे युथ अधिवेशन गोंदिया येथे

◼️भारत भरातून शेकडो तरुण तरुणी येणार एकत्र

गोंदिया◼️नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ द्वारा आयोजित 16 वे राष्ट्रीय अधिवेशन या वर्षी गोंदिया येथील संथागर येथे पार पडणार असुन या अधिवेशन मध्ये भारत भरातुन शेकडो तरुण तरुणी विविध राज्यातून एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारांचे अध्ययन करतील.

या अधिवेशनाची वैशिष्ट्ये म्हणजे येथे रोज सकाळी मेडिटेशन वर्ग आयोजिय केले जातील, त्यात मैत्री भावना ध्यान साधना व आनापानसती ध्यान साधना या ध्यान साधनेचा तरुण मोठ्या उस्साहाने सराव करतील,तसेच विविध सामाजिक विषयावर मार्गदर्शन, तसेच ग्रुप डिसकशन, फ्लोटिंग सेसन, डिबेट स्पर्धा ,ग्रुप प्रेजेंन्टेशन, प्ले फॉर पीस अश्या विविध प्रकारचे सत्र आयोजित केले जाणार आहेत. यात विशेष म्हणजे संपूर्ण भारतातून 200 तरुण तरुणाई मोठ्या उस्साहाने येणार आणि शिबिरात मोठ्या हर्ष उल्लासाने सहभाग दर्शविणार आहेत.

सदर अधिवेशन 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत गोंदिया येथील संथागर येथे पार पडणार असुन या शिबिराचा प्रमुख विषय प्रबुद्ध भारत आहे. यावेळी विविध महापुरुषाच्या विचारांचे आदान प्रदान होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share