राष्ट्रीय राजपुत करनी सेनेनी मोर्चा रॅली काढुन दिली श्रद्धांजली
देवरी : राष्ट्रीय राजपुत करनी सेना चे सुप्रीमो सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या झालेल्या हत्ये विरोधात लोहारा ते देवरी येथे मोर्चा रॅली चे आयोजन करुन सुप्रीमो सुखदेवसिंह गोगामेडी यांना श्रद्धांजली अर्पित केल्यानंतर तहसीलदार देवरी यांच्या मार्फत गृहमंत्री अमित शाह यांना राष्ट्रीय राजपुत करनी सेना तालुका देवरी च्या वतीने निवेदन देऊन मारेक-यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.
जयपुर राजस्थान येथे सुखदेवसिंग गोगामेडी राष्ट्रीय राजपुत करनी सेना यांच्या राहत्या घरी दि.०५ नोव्हेंबर २३ ला झालेल्या हत्ये विरोधात राजपुत संघटनेनी विरोध प्रदर्शन करुन षडयंत्रात सामील असणा-या वर व मारेक-यांवर त्वरित अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या करीता राजपुत समाज महीला , पुरुष व युवकांनी या मोर्चा रॅली सहभागी होऊन सुखदेव दादा अमर रहे असा घोषणा देत माँ धुकेश्वरी मंदिर, बाजार लाईन व राणी दुर्गावती चौकात थांबुन सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या जिवनचरीत्रावर समाज बांधवाना मार्गदर्शन करुन झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करुन तहसीलदार देवरी यांच्या मार्फत गृहमंत्री अमित शाह भारत सरकार यांना निवेदन च्या माध्यमातुन मारेक-यांना व या षडयंत्रात सामील असणा-या वर कठोर कार्रवाई करुन फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
या एक दिवसीय बंद च्या आवाहनाला लोहारा सुरतोली येथील व्यापारी वर्गानी आपले दुकाने बंद ठेवुन समर्थन केले.
या मोर्चा रॅलीत करणी सेना देवरीचे अध्यक्ष राकेशसिंह पवार,प्रकाशसिंह परिहार,कुमारसिंह सोमवंशी,प्रदिपसिंह परीहार प्रेमसिंह परिहार, मोनुसिंह सोमवंशी, प्रमोदसिंह बघेल, युगेश्वरसिंह पवार, व शेकडो राजपुत समाजातील महीला पुरुष सहभागी झाले होते.