देवरी येथे विभागीय क्रीडा स्पर्धा

गोंदिया ◼️नागपूर अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 2 ते 4 डिसेंबर दरम्यान देवरी येथील तालुका क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये गडचिरोली, भामरागड, अहेरी, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, वर्धा, भंडारा व देवरी अश्या एकूण 9 प्रकल्पातील 1503 मुले व 1291 मुली असे एकूण 2794 खेळाडू विद्यार्थी सहभागी होत आहेत. 14, 17 व 19 वर्षे मुले व मुली अश्या 3 वयोगटामध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक तसेच धावण्याच्या सर्व प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल व हँडबॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारातील विजयी विद्यार्थी पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share