जिल्हा परिषद डोंगरगाव ची विद्यार्थिनी आकाशवाणीवर झळकणार

Deori◼️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कोरोना काळापासून आठवड्यातून तीन दिवस रेडिओवरून थेट माता पालक व विद्यार्थ्यांची मुलांच्या अभ्यासाविषयी संवाद साधला जातो. दिनांक *25 नोव्हेंबर 2023 शाळाबाहेरची शाळेचा भाग क्रमांक 539 मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डोंगरगाव वर्ग सातवीतील विद्यार्थिनी *शिवानी दिलीप नेवारे व तिच्या आईची सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्ये तुझ्या आई-वडिलांना सांग.* या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये शिवानी कशी बोलणार हे ऐकण्यासाठी उत्सुकता आहे. शिवानीला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस येरणे, वर्गशिक्षक श्री मुरलीधर चव्हाण, सहाय्यक शिक्षिका जे.डी निर्वाण, स्वयंसेविका कु. पल्लवी चुटे कु. यांनी मार्गदर्शन केले.

Print Friendly, PDF & Email
Share