प्रा. घनश्याम निखाडे यांना ‘पीएचडी’ प्रदान
वैनगंगा बहुउददेशीय विकास संस्था द्वारा संचालित करंजेकर कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग अंड मैनेजमेंट साकोली येथिल प्रा. घनश्याम एस. निखाडे यांना नुकतीच सरदार पटेल युनिव्हर्सिटी, बालाघाट यांची संगणक विभागातील पीएचडी प्रदान करण्यात आली.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधील “ ए स्टडी ऑन टेकॅनिक फॉर एक्सेस कंट्रोल अँड कि मैनेजमेंट इन द क्लाउड फॉर सेक्युर कम्युनिकॅशन’ असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. निखाडे यांनी त्यांच्या पीएचडी दरम्यान सहा पेपर प्रकाशन , एक पुस्तक प्रकाशित केला व दोन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या पीएच.डी.साठी सतत प्रा. डॉ. टी. ए. हिवरकर , डॉ. दिव्या पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. निखाडे यांनी आपल्या यशाचे श्रेय वैनगंगा बहुउददेशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ब्रह्मानंदजी करंजेकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त बी. करंजेकर, डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर शारीरिक शिक्षा निदेशक, डॉ. लोकानंद नवखरे मुख्याद्यापक नवजीवन विद्यालय , डॉ. सुनील चतुर्वेदी प्राचार्य शारीरिक शिक्षण महाविद्यालय , डॉ. धनंजय परबत विभाग प्रमुख शासकीय तंत्रनिकेतन नागपूर , श्री. अनिल येरणे सचिव कृसतंशि संस्था देवरी आणि डॉ. कमलकांत बावनकुळे ,श्री. शिवचरण डी. निखाडे, सौ. शोभा एस. निखाडे ,श्री सुरेश निखाडे , पत्नी सौ. विजया निखाडे मुलगा क्रीतार्थ , श्री फविंद्र निखाडे, श्री. संजय मलेवार, श्री.खेमराज राऊत, श्री. प्रमोद निखाडे, अॅड. पुष्पकुमार गंगबोईर , बापू चांदेवार, सुनील चोपकर आणि इंजी तिलक गावळकर व श्री. जितेंद्र चांदेवार यांना दिले.
याप्रसंगी डॉ. निखाडे म्हणाले, मिळालेली पदवी ही माझी नसून माझ्या जडणघडणीतील प्रत्येक व्यक्तीची आहे. त्यामध्ये माझ्या संस्थेचा तसेच माझ्या कुटुंबातील व मित्र परिवारातील सर्व सदस्यांचा वाटा प्रामुख्याने आहे. आगामी काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अनेक संशोधन करण्याचा मानस आहे’.