देवरी तालुका पत्रकार भवनात ध्वजारोहण

देवरी दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण देवरी तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात ०१ मे गुरुवारला महाराष्ट्र दिनानिमित्त तथा राष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष फाविंद्र हाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रमोद संगीडवार, पंचायत समितीचे उपसभापती अनिल बिसेन, वनक्षेत्राधिकारी सचिन धात्रक, वनपाल दिनेश कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते दिनू सोनसर्वे, दिलीप राऊत, पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष जुबीन खान, सचिव सुरेश चन्ने, कोषाध्यक्ष सुनील चोपकर, संघटक सदस्य देवेंद्र सेलोकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share