जपकसा येथे “आमची दिवाळी वंचितांसाठी” या उपक्रमाचे आयोजन

● मागील ०३ वर्षांपासून दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाऊंडेशन यांच्या तर्फे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन.
● अतिसंवेदनशील भागात असलेल्या गावातील नागरिकांना नवीन वस्त्र,शालेय व क्रीडा साहित्य आणि फराळाचे वितरण

देवरी- अंधारातुन प्रकाशाकडे घेऊन जाणारा भारतीय संस्कृतीमधील दिवाळी हा महत्वाचा सण.हा सण समजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीप्रमाणे साजरा करून आनंद मिळवून घेत असतो,परंतु समाजात असेही काही व्यक्ती असतात की जे हा सण साजरा करण्यापासून वंचीत असतात,समाजातील असे कुटुंब की जे दिवाळी हा सण साजरा करू न शकणाऱ्या वंचीत कुटुंबासोबत सहभागी होऊन त्यांच्या आनंदात आनंद मिळवून घेण्यासाठी दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी आणि सुवर्णप्राशन फाउंडेशन साकोली तसेच मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मागील ०३ वर्षांपासून लोकसहभागातून “आमची दिवाळी वंचितांसाठी”-२०२३ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.या लोकाभिमुख उपक्रमाअंतर्गत दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त क्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या उचेपुर ग्राम पंचायत अंतर्गत जपकसा या गावात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महामानव शहीद बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून साहित्य वितरण प्रारंभ करण्यात आले.मा.श्री.शैलेशकुमार अजमेरा यांच्या अध्यक्षतेखाली तर,श्रीमती शेवंताबाई गहाने (सरपंच, ग्राम पंचायत उचेपुर),श्री.कमलजी घावडे(उपसरपंच, ग्राम पंचायत उचेपुर),श्री.रावजी मुलेटी (माजी सरपंच),श्री. शिवजी
गोटा (ज्येष्ठ नागरिक, ग्राम जपकसा),सुवर्णप्राशन फाऊंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष डॉ.सुनील समरीत,बिरसा ब्रिगेडचे संघटक मा.चेतनदादा उईके,जि.प.शिक्षक पत संस्थेचे संचालक मा.श्री.राजेश रामटेके,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. कुलदिप लांजेवार,चि.रोहित ब्राम्हणकर (भारतीय वायुसेना ),श्री.राजेश अंबादे (सदस्य,ग्रा.पं. उचेपूर),श्री. रवी अंबादे (सचिव, ग्राम पंचायत उचेपुर),मुख्याध्यापक मा. युवराज कोल्हारे,नवोदय
बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.महेश रहांगडाले,सचिव निखिल झिंगरे,सहाय्यक शिक्षक,श्री किशोर नेताम सर,रंजीत धमगाये,सामाजिक कार्यकर्ते श्री.यदु बक्चोरिया,श्री.नरेंद्र सांडील,श्री.संदिप महोबिया,श्री.दिलीप अंबरवाडे, सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे सचिव डॉ.रुपेश परशुरामकर,सहचिव सौ.हितेश्री समरीत,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव सौ. कल्याणी लांजेवार,सदस्य सौ.प्रगती लांजेवार यांच्यां प्रमुख उपस्थित या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्राम जपकसा येथील या उपक्रमात जवळपास गरजू ४७ कुटुंबातील २६७ महिला-पुरुष,लहान बालक,दिव्यांग बंधू,वृद्ध नागरिक प्रमुख यांना नवीन कपडे,फराळ व मिष्ठान या साहित्याचे वितरण करण्यात आले.यामद्ये सर्व कुटुंबातील लहान व मध्यम बालकांना नवीन कपड्यांसह शैक्षणिक साहित्य,गावातील युवकांच्या कबड्डी संघाला कबड्डी या खेळाचे पोशाख संच,वितरीत करून अनोख्या रुपात दिवाळी हा सण साजरा करण्यात आला.यापुर्वी ग्राम जपकसा येथे कधीही अशा प्रकारचे उपक्रम झाले नसल्याने लहान बालकांसह ज्येष्ठ वृद्ध महिला आणि पुरुष मंडळी यांच्या चेहऱ्यावर वेगळे हास्य निर्माण उमटतांनाचे चित्र बघावयास मिळाले.तर दिवाळी सारखा महत्वाचा सण साजरा करण्यापासून वंचित असणाऱ्या या कुटुंबाच्या प्रवासात आनंद बघून एक वेगळा आत्मानंद मिळत असल्याच्या भावना आयोजकांकडून व्यक्त केल्या गेल्या. गत ०३ वर्षापासून संस्थेला मिळत असलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न होत असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.या उपक्रमाला यावर्षी ०४ वर्ष पूर्ण होत असून संस्थाना आर्थिक,वस्तू आणि इतर स्वरूपात सहकार्य करणाऱ्या दानदात्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातुन संस्थेअंतर्गत सामाजीक क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याची वलये विस्तारीत होत असल्याचे यावेळी आयोजकांकडुन व्यक्त करण्यात आला असून संस्थेद्वारे आयोजित लोकाभिमुख उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळींनी केले.कार्यक्रमाचे संचालन रंजीत धमगाये,
प्रास्ताविक चेतन उईके तर समारोपिय मनोगत शैलेशकुमार अजमेरा यांनी केले.आयोजित उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम जपकसा येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक सुजित बोरकर,आशा सेवीका सौ.माधुरीताई मुलेटी, किरणकुमार रामटेके,सीतेशकुमार ईश्वर,हर्षवर्धन मेश्राम,सुरेश राठी,मनोज कोडापे यांच्या सह संस्थेच्या स्वयंसेवकांनी आणि ग्रामवासीयांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share