हातभट्टी दारू ठिकाणांवर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांची पथकासह धाड , 81 हजार 121/- रूपयाचा मुद्देमाल जप्त


गोंदिया ◼️पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा, यांना गणेश उत्सव, ईद सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर, प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच अवैधरीत्या मोहफुलाची हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित केले होते.

या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, अशोक बनकर, यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी संकेत देवळेकर, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात देवरी उपविभागात अवैध धंदे करणाऱ्याविरूध्द मोहीम राबविण्यात आली असून धाड कारवाई सुरू आहे. या अनुषंगाने दिनांक 24-09-2023 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, यांनी स्वतः देवरी उपविभागिय पोलीस पथकासह अवैध दारु विक्री व हातभट्टीवर धाड कारवाई करीता पो. स्टे. अर्जुनी/मोर परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मौजा -पिंपळगांव येथील नामे- योगिराज दसरु मेश्राम, हा त्याचे राहात्या घराचे मागील सांदवाडीत अवैध मोहफुलाची हातभट्टी लावुन दारु काढत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यावरुन पोलीस स्टाफसह तात्काळ मौजा पिंपळगाव येथे पोहचून नामे-योगिराज दसरु मेश्राम रा. पिंपळगांव यांचे घरी अवैध दारु बाबत धाड कारवाई केली असता त्याचे राहते घरी 1) 44 नग 90 मी. ली. भरलेली देशी दारु, 2) 06 नग 90 मी.ली. भरलेली रंगीत देशी दारु, 3) 2 नग 180 मी.ली भरलेली ओ.सी.ब्लु इंग्रजी दारु, 4) एका प्लास्टीक डबकीत अंदाजे 10 लिटर मोहफुलाची दारु, 5) सांदवाडीत 5 नग मातीच्या मडक्यात 100 किलो सडवा, 6) 85 बोरी मोहफुल असा एकुण 81,121/- रु चा माल विनापास परवाना अवैधरित्या बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी नामे.- योगिराज दसरु मेश्राम रा. पिंपळगांव यांचेविरुध्द पोहवा.कोडापे यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन अर्जुनी/मोर येथे अप. क्र. 271/2023 कलम 65 (), 77 (), 65() महा. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सपोनि. तागड, पो. स्टाफ पोहवा- गाते, पारधी, फुलबांधे, राऊत, करंजेकर कोसमे,पोना. बंजार, चापोहवा. जोगेकर, खोब्रागडे यांनी केली आहे.

Share