देवरी येथे जय श्रीराम ग्रुप ची कावड यात्रा उत्साहात

देवरी ■ श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी जय श्रीराम ग्रुप द्वारा कावळ यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात देवरी शहरात २७ ऑगस्ट रोजी काढण्यात आली. तालुक्यातील वडेगाव येथील त्रिवेणी संगम महादेव घाट नदीवरून ते देवरी शहरातील नगरपंचायत जवळील शिव मंदिरापर्यंत शिव कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .

वडेगाव घाटावरून कावड मध्ये जल भरून हर हर महादेव च्या गजरात वडेगाव ते देवरी शिवभक्तांनी कावळ घेऊन पदयात्रा काढली. यावेळी शेकडो पुरुष, महिला, मुले मुली उपस्थित होते. कावड यात्रा देवरी शहरात पोहोचल्यावर हरहर महादेव च्या गजरात संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. शिवभक्तांनी कावळ खांद्यावर घेऊन कावड यात्रा निघाली. पहिल्यांदाच शहरात कावड यात्रेचे शहरवासीयांनी स्वागत केले.

शहरभ्रमण केल्यानंतर नगरपंचायत जवळील शिव मंदिरात कावड यात्रेचे समापन करण्यात आले . यावेळी शिवभक्तांद्वारे शिव मंदिरात सामूहिकरीत्या महा जलाभिषेक व महाआरती करण्यात आली . नंतर निघालेल्या महाप्रसादाचे वितरण करण्यातआले. हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण शहर पहिल्यांदाच दुमदुमले होते . या यात्रेच्या आयोजनात गोलू गुप्ता, दीपक शाहू, कुणाल कत्रे, सचिन राणा, राहुल शाहू, दुर्गेश शाहू, प्रज्योत भांडारकर, मुकेश रक्षणवार, शैलेश चित्रिव, अंतरिक्ष बहेकार, नितीन मोटघरे, चंदन शर्मा, सागर जैन, अभिषेक वाडेगावकर, महेश गुप्ता, मोहन सोनसर्वे, नीलकमल टेंभरे, चेतन चनोरे यांनी सहकार्य केले. तर विनोद चित्रिव यांची शंकरजींची भूमिका आकर्षणाची केंद्र ठरली.

Print Friendly, PDF & Email
Share