दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत दर्श चा वाढदिवस साजरा

■ या निमीत्य विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप

देवरी ◼️येथील रहवासी असलेले पदवीधर शिक्षक देवेन्द्रकुमार पारधी व पत्नी भुमिताई पारधी यांचा मुलगा दर्श यांनी आपला ७ वा वाढदिवस रविवार (ता.२० आगस्ट ) रोजीदेवरी येथील दंडकारण्य निवासी दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. या निमीत्य विद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुध्दा करण्यात आले.
यात सविस्तर असे की, कोरची येथे कार्यरत पदवीधर शिक्षक देवेन्द्रकुमार पारधी हे पत्नी भुमीताई पारधी सोबत देवरी येथे राहतात. यांचा मुलगा दर्श याचा ७ वा वाढदिवस पारधी दांपत्यांनी दर्श सोबत देवरी येथील दंडकारण्य निवासी दिव्यांग विद्यालयात जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. तसेच या निमीत्य त्यांनी या विद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सुध्दा केले. यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य उमलले होते.
याप्रसंगी यांच्यासोबत शिक्षक अरविंद सलामे,सहपत्नी प्रियंका सलामे, मुख्यध्यापक के.पी.लांजेवार, श्री आरसोडे , एच.एन.घोडेस्वार यांच्या विद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
(

Print Friendly, PDF & Email
Share