माजी नगरसेवकाने केला शिवभोजन केंद्रात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भंडारा ◼️अल्पवयीन मुलीचा माजी नगरसेवकाने विनयभंग केल्याची घटना स्वातंत्र्यदिनी तुमसर येथील एका शिवभोजन केंद्रात घडली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपी प्रदीप महादेव भुरे (64) रा. मालवीय वॉर्ड तुमसर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मालवीय वार्डातील भुरे यांच्या घरी शिवभोजन केंद्र आहे. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलगी ही भाजी आणण्याकरिता गेली होती. तेव्हा प्रदीप भुरे याने सदर अल्पवयीन मुलीला स्वयंपाकघरातून पिण्याचे पाणी आणण्याकरिता सांगितले. यावेळी तेथे कुणीच नसल्याची संधी साधून तो मुलीच्या मागे गेला बळजबरीने अश्लील चाळे केले. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने पळ काढून आपल्या कुटूंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पिडीत मुलीच्या आईवडीलांनी तत्काळ पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरूद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी कलम 354, 354(अ)(1), बाल लै.अ.प्र.का. 2012 चे सहकलम 8,12 नुसार आरोपी प्रदीप भुरे याच्या विरूध्द गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनात तृप्ती खंडाईत व चमू करीत आहे.

Share