मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सन्मानित

देवरी ◼️ शासनाने राबवित असलेल्या सुंदर माझा दवाखाना तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण प्रतिबंधक योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वतंत्रदिनी सन्मानित करण्यात आले.

पोलिस मुख्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते मुल्लाचे वैद्यकीय अधिकारी रामकृष्ण झेड. येरणे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पवन कटरे, आरोग्य सहाय्यक नान्हे, आरोग्य सहाय्यका नंदनवार, आरोग्य सेवक बावनथडे आदींचाही जिल्हाधिकार्‍यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.

Share