सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथे विविध कामांचे भुमीपुजन व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन

गोंदिया ◼️सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथे पोलीस अधिक्षक गोंदिया निखील पिंगळे यांचे मंजुरी आदेशाने व अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कैंप देवरी यांचे मार्गदर्शनाखाली दि.१७/०८/२०२३ रोजी संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे हस्ते सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव येथील विविध मंजूर कामांचे भुमीपुजन करण्यात आले तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या एकुण ६३ प्रशिक्षणाच्यांना विविध स्पर्धा परीक्षा विषयी सविस्तर शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम , सपोनि. जोहेब शेख , सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सचिन घाटे , पोउपनि प्रताप बाजड , SRPF चे पोउपनि अटकरे तसेच जि.पो. व SRPF चे अंमलदार उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share