दिशांत शिक्षण संस्था संचालित सरस्वती शिशु मंदिर देवरी येथे ध्वजारोहण
देवरी – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त दिशांत शिक्षण संस्था संचालित सरस्वती शिशु मंदिरात संस्थेचे सहसचिव छोटेलाल बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सल्लागार सदस्य ॲड. प्रशांत संगीडवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, प्रधानाचार्य सुरेश चन्ने, अनेक पालक बंधू – भगिनी आणि सर्व कर्मचारी वर्ग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर वैयक्तिक आणि सामुहिक गीत सादरीकरण करुन उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले.