ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

देवरी : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. यामध्ये केजी पासून १० व्या वर्गाचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.

ब्लॉसम स्कुलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी हातानी तयार केलेले भेट कार्ड्स शिक्षकांना समर्पित केले आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य , शिक्षक आणि शिक्षिका मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रुती राठोड आणि आभार वाणी पटले हिने मानले.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केजी च्या शिक्षिका मनीषा काशीवार, प्राथमिक चे नलू टेंभरे , तनुजा भेलावे , संगीत काळे , भोजराज तुरकर , राहुल मोहुर्ले , विश्वप्रित निकोडे , योगिता मेश्राम , वैशाली मोहुरले, नावदेव अंबाडे , नितेश लाडे, तेजस्विनी नंदेश्वर आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share