नवोदय परीक्षेत जिप ओवारा शाळेचे २ मुलींची निवड

देवरी ◼️ जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि ओवारा शाळेच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा रोवला गेला. यापूर्वी कधी नव्हे तर प्रथमच ओवारा सारख्या ग्रामीण भागातील प्रथमच दोन मुलीनी सन 2022-23 मध्ये नवोदय विद्यालयाद्वारे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश मिळवत आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहून घेतलं. कु. श्रुती खुमेंद्र बिसेन व कु. निहारिका वसंत परतेती या दोन्ही मुलींनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक नुकतेचरुजू झालेले भोयर तसेच त्यांचे मार्गदर्शक प्रणित कराडे,अंबालाल डोंगरे, वसंत नाईक , भागवत भोयर (तत्कालीन मुख्या) असे सर्व शिक्षक वृंद, आई -वडील यांच्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त केल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत ओवाराचे सरपंच व सदस्य यांनीही यशस्वी मुलीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले. तसेच शिक्षकांप्रती समाधान व्यक्त केले व शाळेची अशीच शैक्षणिक प्रगती सतत होत राहो अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share