ब्रेकिंग: भरधाव ट्रक ने दोघांना चिरडले, बापलेकाचा जागीच मृत्यू

◼️ट्रकच्या धडकेत बापलेकाचा मृत्यू डोंगरगाव डेपो गावात नजिक घटना

देवरी ◼️ राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली असून आज देवरी तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी असलेले सुनील पोगळे अंदाजे वय ३५ वर्षे आणि सेवकराम पोगळे अंदाजे वय ६० वर्षे नागपूर वरून स्वगावी लोहारा येथे येत असतांना भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक देवून चिरडल्यामुळे भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे लोहारा गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव डेपो नजीक एका ट्रक चालकाचे ट्रक नियंत्रण सुटून दुचाकीस्वार बाप लेकांना पूर्णतः चिरडून टाकले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील दोघेही बापलेकाचे शरीर पूर्णतः छिन्नभींन झाले. नागपूर वरून आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 35 डब्ल्यू 0328 गाडीने स्वगावी देवरी तालुक्यातील लोहारा येत असताना ट्रक क्रमांक C.G.08AK 8822 मागच्या बाजूने दुचाकी स्वाराला धडक दिली त्यामुळे दुचाकी चालकावरील दोघेही बापलेक ट्रकच्या खाली आले.
ही घटना देवरी पोलीस स्टेशन हद्दीत येत असून पुढील तपास देवरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share