विद्यार्थ्यांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
Deori :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सहेषराम कोरोटे होते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अशोक बनकर, उपायुक्त दशरथ कुळमेथे, सह आयुक्त अनिता पिल्लेवार, प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, निरज मोरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, राजकुमार पुराम, सभापती सविता पुराम, अंबिका बंजार, मधुकर उईके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी मागील दोन वर्षापासून राबवित असलेल्या विविध उपक्रमापैकी उन्हाळी शिबिर हा एक उपक्रम यावर्षी 28 एप्रिल ते 30 मे 2023 या कालावधीमध्ये मुला-मुलींसाठी वेगवेगळा न राबविता एकाच ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव येथेच आयोजित केल्याचे सांगितले. देवरी प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या 11 शासकीय आश्रमशाळेतील प्रत्येक शाळेतील इयत्ता नववी व अकरावीत शिकत असलेले पाच मुले व पाच मुली असे एकुण 10 विद्यार्थी व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार येथील 10 मुले व 10 मुली असे एकुण 130 विद्याळर्थ्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ब्युटी थेरेपिस्ट, इंग्लिश स्पिकिंग, धनुर्विद्या, गोंडी चित्रकला, तायक्वांदो, विविध मैदानी खेळ, योगाभ्यास, कला व संगीत हे विषय या प्रशिक्षणात घेण्यात आले.
इतिहासात प्रथमच JEE (Main) परिक्षेत 17 आदिवासी विद्यार्थ्यांनी यश मिळवून देवरी प्रकल्पाचे नाव देशपातळीवर लौकीक केल्याबद्दल प्राचार्य एकलव्य मॉडेल रेसिडेशियल स्कुल बोरगाव/बा संजय बोन्तावार यांचा गौरव करण्यात आला. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी विजय मेश्राम, शिरीष सोनेवाने यांनी उन्हाळी प्रशिक्षण शिबीर यशस्वी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाययक प्रकल्प एच.आर. सरीयाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुण सुर्यवंशी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी मानले.