सीबीएसई १० च्या परीक्षेत श्रुती मरकाम तालुक्यात अव्वल

देवरी : सीबीएसई ने घोषित केलेल्या दहावीच्या परीक्षेत न्यू सीता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये श्रुती लक्ष्मीशंकर मरकाम या विद्यार्थिनीने 95.40 टक्के घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावित बाजी मारली आहे. यासोबत विनय शहारे 87.60, आकांशा डोये 86.60, नंदिनी गजबे 83.40, कुंदन गायधाने 80.80 टक्के घेत यश संपादन केले. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अशोक उईके ,विषय शिक्षक व आपल्या आई वडिलांना दिले.
सर्व प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष अनिल अग्रवाल, सचिव अंकित अग्रवाल, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

यावेळी श्रुती मरकाम हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याचे माध्यमांना सांगितले. पुढे नीट च्या परीक्षेत यश संपादन करायचं असल्याचे सांगितले. यावेळी श्रुतीचे वडील लक्ष्मीशंकर मरकाम यांनी प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share