बीएसएनएल टावर वर लावलेले बॅटरी चोरांनी उडविली
देवरी ◼️तालुक्यातील शेंडा येथील बीएसएनएल टॉवरची बॅटेरी चोरी गेली असून फिर्यादी रितेश रूमण खोटेले, वय २६ वर्ष, रा. चिखली हे मौजा शेंन्डा येथील बीएसएनएल टावर वर लावलेले व्हिजन १०० एएच. चे बॅटरी बॅकअप चेक करने करीता गेले असता तेथील एक व्हिजन १०० एएच ची जुनी वापरती बॅटरी किंमती अंदाजे ३०,०००/-रू. ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप. कं. १३६/२०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास सफौ. कुभरे, पोस्टे देवरी, हे करीत आहेत.