शशीकरण मंदिराकरिता बायपास द्या
योगीराज धुनीवाले बाबा सेवा समितीची मागणी : अन्यथा कामबंद आंदोलनाचा इशारा
सडक अर्जुनी ◼️हजारों वर्ष पुरातन तालुकांतर्गत महामार्ग क्रं 6 वर विराजित शशीकरण बाबा देवस्थान हे आदिवासी समाजाचे आराध्या दैवत आहे. मंदिरात हजारो वर्षांपासून विदर्भातील लाखोच्या संख्येत भाविक येतात. हा मंदिर महामार्ग क्रं 6 वर डुग्गीपार गावालगत जंगलव्याप्त परिसरात विराजित असून योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्यावतीने महामार्ग क्रं 6 चा चौपदरीकरणाचे काम अग्रवाल कंपनी करत आहे. या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बायपास रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याकडे आले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आगामी सात दिवसांत रस्त्याची निर्मिती कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराज, राहूल वणवे व भाविकांनी दिला आहे.