गोंदिया जिल्ह्यातील 9 पोलिस निरिक्षकांच्या आंतरिक बदल्या

गोंदिया◼️गडचिरोली-गोंदिया क्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांच्या परवानगीने जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी जिल्ह्यातील 9 पोलिस निरिक्षकांच्या आंतरिक बदल्या केल्या आहेत. पोलिस प्रशासनात सुसुत्रता यावी यासाठी हे फेरबदल असल्याचे बोलले जात आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक महेश बनसोडे यांना राज्यमार्गावरील महत्वाच्या गंगाझरी पोलिस ठाण्यात स्थानांतरीत करण्यात आले. गोरेगावचे पोलिस निरिक्षक सचिन म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात क्षेत्रात केलेल्या चागंल्या कार्यामुळे गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोंदिया ग्रामीणचे पोलिस निरिक्षक अजय भुसारी यांचे गोरेगाव येथे, तिरोडाचे पोलिस निरिक्षक दिनेश तायडे यांच्याकडे नक्षल सेल व आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांना जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी, पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांना तिरोडा, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक बाबासाहेब बोरसे यांना सालेकसा, नियंत्रण कक्षाच्या पोलिस निरिक्षक नंदीनी चानपुरकर यांना अ.मा.वा.प्र. कक्ष गोंदिया व मानव संसाधन शाखेचा अतिरिक्त प्रभार आणि अ.मा.वा.प्र.विभागाचे पोलिस अधिकारी सतीश जाधव यांना दवनीवाडा येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share