सासरा, पत्नी, मुलाला पेट्रोल टाकून जाळले

गोंदिया ◼️जावयाने सासरा, पत्नी, मुलगा यांना पेट्रोल टाकून जाळण्याची घटना शहाराजवळील सूर्याटोला येथे आज 15 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत सासऱ्याचा करून अंत झाला तर पत्नी, मुलगा हे नागपूर येथे रुग्णालयात मृत्यूची झुंज देत आहेत. देवानंद मेश्राम (५२) रा. सूर्याटोला असे मृतक सासऱ्याचे नाव आहे. आरती किशोर शेंडे (३५), जय किशोर शेंडे (५) रा. भिवापूर ता. तिरोडा असे गंभीर जखमींची नावे आहेत. दरम्यान आरोपी किशोर शेंडे (४०) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेत आरती व जय हे ९० टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे. माहितीनुसार आरोपी किशोर हा पत्नीशी नेहमी भांडण घालून त्यांना मारहाण करीत असल्याने पत्नी आरती ही मुलासह वर्षा भरापूर्वी माहेरी सुर्याटोला येथे आली होती. आरती ही शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. घटनेच्या रात्री देवानंद मेश्राम हे बाहेरच्या छपरीत तर आरती व जय हे आतील खोलीत झोपले असताना आरोपी किशोर याने प्रथम सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल घालून आग लावली. यानंतर आत झोपलेल्या पत्नी आरती व मुलगा जयच्या अंगावरही पेट्रोल ओतून आग लावून तो पसार झाला. यावेळी देवानंद आरती व जय यांनी आरडाओरडा केली. दरम्यान शेजारी जागे झाले. यात तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान देवानंद यांचा मृत्यू झाला तर आरती व जय यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेही मृत्यूशी झुंज देत असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद करून आरोपी किशोरचा शोध सुरू केला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें