स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले- कल्पना वालोदे

देवरी ४:

जि.प.प्राथमिक शाळा धोबिसराड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश वालोदे , प्रमुख अतिथी म्हणून करे मुख्याध्यापक, धमगये सहायक शिक्षक, भारती बारसागडे, विशाखा शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून दिप प्रज्वलित करून अभिवादन केले तसेच सामाजिक कार्यकर्त्या कल्पना वालोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहण्यात आली.

पाहुण्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महिला शिक्षण दिनानिमित्त यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीच्या लेकी नी उपकाराची परतफेड करताना आपल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न शिल अशावे. स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे प्रतिपादन कल्पना वालोदे यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Share